राजकारण

पंकजा ताईंच्या कामावर प्रश्न विचारले म्हणून थेट जीवे मारण्याची धमकी?

स्वराज्य शक्ती सेनेच्या करुणा मुंडे यांचा आरोप; बीडमधील "त्या" कॉलमुळे खळबळ

बीड, (प्रतिनिधी): मंत्री पंकजा मुंडे (पालवे) यांच्या एका कथित कार्यकर्त्याने स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांना रात्री १२ वाजता फोन करून “पंकजा ताईंबद्दल व्हिडिओ बनवू नकोस,” असे म्हणत या कार्यकर्त्याने त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी एका व्हिडिओद्वारे केला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चांगलीच खळबळ उडाली आहे.

स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडे (पालवे) यांच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवून तो समाज माध्यमांवर व्हायरल केला होता. सदर व्हिडिओमुळे चिडून जात संतापलेल्या कथित कार्यकर्त्याने करुणा मुंडे यांना कॉल केला. “तू बीडमध्ये राहते, मग तू आजवर काय केले?, असा प्रश्न विचारला. त्यावर करुणा मुंडे यांनी “मी मंत्री नाही. जर मी मंत्री असते, तर अन्यायाविरुद्ध जागेवरच न्याय दिला असता. न्याय देण्याचे काम लोकप्रतिनिधींचे आहे.”, असे उत्तर कथित कार्यकर्त्याला दिले. तसेच “मला धमकी देण्यापेक्षा तुमच्या नेत्याला लोकांची कामे करण्यास सांगा. फक्त जातीपातीचे राजकारण करून आणि स्वतःची पोळी भाजून मोठे भ्रष्टाचार करू नका, असे सुनावले. त्यावर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी यापुढे पंकजाताईंबद्दल व्हिडिओ बनवायचा नाही, व्हिडिओ बनवला तर याद राखा, असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करुणा मुंडे यांनी सदर व्हिडिओतून केला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून या घटनेमुळे बीडमध्ये सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!