क्राईम जगत

खळबळजनक: हॉटेल चालक महिलेचा विनयभंग

दारू न दिल्याने केला राडा; समृद्धी महामार्गाजवळ डोणगाव शिवारातील घटना

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): स्वतःच्या व कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी डोणगाव शिवारात समृद्धी महामार्गालगत हॉटेल चालविणाऱ्या महिलेच्या हॉटेलमध्ये घुसून आरोपींनी दारूची मागणी केली. महिलेने आपण दारू विकत नसल्याचे सांगताच आरोपी तरुणाने महिलेसोबत अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. मेहकर तालुक्यातील डोनगाव पोलीस स्टेशन हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी डोणगाव पोलिसांत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहकर तालुक्यातील शेलगाव बाजार परिसरातील रहिवासी असलेल्या ४७ वर्षीय महिलेचे समृद्धी महामार्गाजवळ डोणगाव शेतशिवारात हॉटेल आहे. १५ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सदर महिला आपल्या हॉटेलवर असताना यातील आरोपी लक्ष्मण सोमटकर (वय ३५ वर्षे) रा. डोणगाव हा हॉटेलवर गेला आणि त्यांच्याकडे दारूची मागणी केली. त्यावेळी महिलेने दारू नसल्याचे सांगत दारू देण्यास नकार दिला. नकाराचा राग मनात धरून आरोपी लक्ष्मण सोमटकर याने महिलेसोबत सोबत हुज्जत घातली. एवढ्यावरच न थांबता त्यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर हात टाकून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरड करत प्रतिकार केल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

याप्रकरणी पीडित महिलेने डोणगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी लक्ष्मण सोमटकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम कलम ७४, ११५ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार संजय घिके हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!