क्राईम जगत

खळबळजनक: १६ वर्षीय मुलीचे अपहरण

देऊळगाव राजा पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

आनंद इंगळे

देऊळगाव राजा (प्रतिनिधी):शहरातील संजयनगर परिसरातून अवघ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देऊळगाव राजा शहरातील संजयनगर परिसरात राहणाऱ्या ज्योती लिलीन पवार (वय ३५ वर्षे) यांची मुलगी हर्षा ज्योती पवार (वय १६ वर्षे) ही १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेच्या दरम्यान घरातून अचानक बेपत्ता झाली. कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. या प्रकरणी ज्योती पवार यांनी देऊळगाव राजा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पटेल ह्या करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!