क्राईम जगत

मलकापूर: हरसोड्याच्या ५१ वर्षीय इसमाची गळफास लावून आत्महत्या

दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

अजय टप

मलकापूर (प्रतिनिधी): मलकापूर येथील दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हरसोडा (ता. मलकापूर) येथील एका ५१ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची घटना नुकतीच समोर आली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हरसोडा (ता. मलकापूर) येथील रहिवासी असलेले वाल्मीक पंढरी झाल्टे (वय ५१ वर्षे) यांनी आज २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घराच्या छताला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला.

याप्रकरणी अनंता तुकाराम झाल्टे (वय ४१ वर्षे) रा. हरसोडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार राजेश बावणे हे करीत आहेत. वाल्मीक झाल्टे यांनी आत्महत्या का केली?, याचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!