क्राईम जगत

खळबळजनक: मकाच्या शेतात नेऊन विवाहितेवर बलात्कार

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून केले वारंवार लैंगिक शोषण; आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

चिखली, (प्रतिनिधी): विवाहितेला जबरदस्तीने मकाच्या शेतात नेवून आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्तापीत केले. घडलेल्या प्रकाराचा मोबाइलमध्ये व्हिडीओ काढला. ही बाब तुझ्या नवऱ्याला सांगितले तर तुझ्या नवऱ्याला आणि मुलांना जीवाने ठार मारुन टाकेल, अशी धमकी दिल्याची खळबळजनक घटना अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात घडली. या प्रकरणी पीडित महिलेने २४ फेब्रुवारी रोजी अंढेरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी उपरोक्त आरोपी विरुद्ध बलात्कारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील रहिवाशी असलेली एका २५ वर्षीय विवाहित महिला मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करते. गेल्या एक वर्षांपासून ती मजुरीसाठी शेतात एकटी जाते. यातील आरोपीने सदर महिलेला एकटे पाहून तीच्यासोबत बळजबरीने आपल्या मोबाइलमध्ये फोटो काढला. महिलने ‘माझा फोटो का काढला’, अशी विचारणा केली असता, आरोपी मोटारसायकलवर बसून घटनास्थळावरुन निघून गेला. महिला नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी शेतात गेली असता, आरोपीने तीचा हात धरला व बळजबरीने तीच्यासोबत शारीरिक संबंध केले. एवढ्यावरच न थांबता या विकृताने तीच्या सोबत शारीरिक संबंध करतानाचे व्हिडिओ काढले आणि ही बाब कोणाला सांगितली तर याद राख, तुला, तुझ्या पतीला आणि मुलांना जीवाने ठार मारून टाकेल. तुझे फोटो व्हायरल करुन टाकेल, अशी धमकी देऊन तीचे वारंवार लैंगित शोषण केले. सन २०२४ मध्ये पीडित महिला माहेरी गेलेली असतांना आरोपीने तीच्या आईला फोटो दाखवण्याची धमकी देऊन बळजबरीने तीच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा गावातील एका शेतकऱ्याच्या मकाच्या शेतात नेऊन बळजबरीने तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपीकडून धमकी देऊन वारंवार सुरु असलेला लैंगिक अत्याचार असाह्य झाल्याने पीडित महिलेने अंढेरा पोलीस स्टेशन गाठून आपबीती कथन केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी आरोपी शादाब खान सखावत खान रा. मेरा खुर्द याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ६४, १२६ (२), ३५१(२) सहकलम ३ (१), (आर),(एस), ३ (२)(व्हीए), ३(२)(५), ३(१) (डब्ल्यु)(१)(२) अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अनधिनियम १९८९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपीर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!