सावधान! नांदुरा येथील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : नांदुरा येथील प्रसिद्ध मोठी हनुमान मूर्ती परिसरातून एक १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये ‘मिसिंग’ दाखल करण्यात आली आहे.

दहीवडी (ता.नांदुरा) येथील रहिवासी असलेल्या रत्नाबाई राजू ब्राम्हणे (वय ४० वर्षे) यांची मुलगी समीक्षा राजू ब्राम्हणे (वय १९ वर्षे) ही सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघाली. नांदुरा येथील राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या हनुमान मूर्तीजवळ ती ऑटोमधून उतरली. मात्र, त्यानंतर ती शाळेत पोहोचली नाही आणि सायंकाळपर्यंत घरीही परतली नाही. कुटुंबीयांनी गावामध्ये, नातेवाईकांकडे आणि तिच्या मैत्रिणींकडे समीक्षाचा शोध घेतला, मात्र तिचा कोठेही पत्ता लागला नाही.

याप्रकरणी रत्नाबाई ब्राम्हणे यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे.बेपत्ता समीक्षाची उंची उंची ५ फूट, रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, डोळे काळे, केस काळे लांब असून तिने पोपटी रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची लेगिन्स घातलेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सय्यद हे करीत आहेत. उपरोक्त वर्णनाच्या तरुणीबाबत काही माहिती मिळाल्यास नांदुरा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!