डोंगरशेवली येथून माय-लेक बेपत्ता

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथून २५ वर्षीय विवाहित महिला आपल्या २ वर्षांच्या चिमुकल्या मुलासह बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये ‘मिसिंग’ दाखल करण्यात आली आहे.

डोंगरशेवली येथील रहिवासी असलेल्या लक्ष्मीबाई आनंदा सुरडकर (वय ५० वर्षे) यांची मुलगी आणि नातू ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले आहेत. नातेवाईक, ओळखीचे लोक आणि परिसरात सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून आले नाहीत.

याप्रकरणी लक्ष्मीबाई आनंदा सुरडकर यांनी ९ मार्च रोजी अमडापूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. अश्विनी महिंद्र आराख हिचा रंग काळा-सावळा असून तिने शेंदरी रंगाची साडी, काळ्या रंगाचे ब्लाउज घातलेले आहे. उपरोक्त वर्णनाच्या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास अमडापूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अंमलदार निवृत्ती चेके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!