नांदुऱ्यातून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : नांदुरा येथील दुर्गा नगर भागातील रहिवासी असलेल्या एका २२ वर्षीय तरुणी गूढरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. १८ मार्च २०२६ रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये ‘मिसिंग’ची नोंद करण्यात आली आहे.

नांदुरा शहरातील दुर्गा नगर, वार्ड नंबर दोनमध्ये राहणारे नंदकिशोर रामराव देशमुख (वय ४५ वर्षे) हे नगरपालिकेत नोकरीला आहेत. त्यांची २२ वर्षांची मुलगी चंचल नंदकिशोर देशमुख, ही १८ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.५५ वाजेच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. बराच वेळ झाला तरी ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि गावातील इतर संभाव्य ठिकाणी शोध घेऊनही चंचलचा कुठेही पत्ता लागला नाही.

या प्रकरणी नंदकिशोर देशमुख यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार मोहिद्दीन सय्यद हे करत आहेत. चंचल नंदकिशोर देशमुख हिची उंची ५ फूट ३ इंच, रंग गोरा, चेहरा गोल, केस काळे आणि लांब, डोळे काळे, नाक सरळ, बांधा मध्यम असून तिने अंगात फिक्कट जांभळ्या रंगाचे टी-शर्ट आणि ग्रे रंगाची नाईट पॅन्ट घातलेली आहे. उपरोक्त वर्णनाची तरुणी कोठे दिसून आल्यास किंवा तिच्याबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ नांदुरा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!