मोताळा येथे पत्रकारांचे धरणे आंदोलन

मोताळा,(प्रतिनिधी) : पत्रकारांवरील अन्याय थांबविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. १) मोताळा तहसील समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनानुसार, लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा वृत्तपत्र उद्योगावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. २०१९ पासून आजतागायत कागद, प्रिंटिंग मटेरियल, केमिकल्स, वीज, मनुष्यबळ या सारख्या मूलभूत खर्चात १५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र जाहिरात दरात वाढ झाली नाही. त्यामुळे जाहिरात दरात किमान १५० टक्के दरवाढ तातडीने मंजूर करण्यात यावी. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पत्रकारांना लक्ष्य करण्याचे सत्र सुरू आहे. अनेक ठिकाणी पत्रकारांवर अन्याय झाला. लोकशाहीच्या चौथा स्तंभाची गळचेपी करण्याचा प्रयत्न होत आहे. सदर प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते, तालुकाध्यक्ष हमीद कुरेशी, पप्पू राठी, शाहीद कुरेशी, विष्णू शिराळ, श्रीधर राजनकर, गणेश झंवर, अर्चना फाटे, सविता शिराळ, दिलीप चहाकर, पंकज थिगळे, प्रकाश गणगे, गणेश वाघ, जावेद खान, तानाजी ठोंबरे, पी.एम. सरकटे, अकिल कुरेशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!