विशेष वृत्तांत: तुमच्या-आमच्या घरातल्या लेकी सुरक्षित आहेत का? अमरावतीच्या त्या ‘सैतानाने’ माणुसकीच वेशीवर टांगली!

अमरावती,(प्रतिनिधी): अमरावती जिल्ह्याच्या शांततेला आज एका नराधमाने सुरुंग लावला आहे. पण ही घटना केवळ अमरावतीच्या एका कोपऱ्यात घडली म्हणून आपण गप्प बसायचे का? नाही. कारण आज जे अमरावतीत घडलंय, ते उद्या तुमच्या शहरात, तुमच्या गल्लीत किंवा तुमच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. परतवाडा-अचलपूरच्या मातीत एका अयान अहमद नावाच्या विकृताने जे पेरलंय, ते पाहून काळजाचा ठोका चुकतो आणि रक्ताची सळसळ थांबते. ही बातमी वाचताना प्रत्येक बापाने आणि भावाने स्वतःला एकच प्रश्न विचारावा— आपण आपल्या लेकीबाळींना कोणत्या समाजात सोडून मोकळे झालो आहोत?

अमरावती जिल्ह्यातून समोर आलेलं हे प्रकरण म्हणजे केवळ एक गुन्हा नाही, तर ती एक सामाजिक विकृती आहे. १९ वर्षांचा अयान अहमद तन्वीर अहमद… वय खेळण्या-बागडण्याचे आणि करिअर घडवण्याचे, पण या वयात या नराधमाने ‘शिकारी’ बनण्याचं प्रशिक्षण घेतलं. त्याने प्रेमाचा बुरखा ओढला आणि एकामागून एक अनेक निष्पाप, अल्पवयीन मुलींना आपल्या वासनेच्या जाळ्यात ओढले.

हे जाळे इतके भयानक होते की, त्यात अडकलेल्या मुलींना बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. केवळ शारीरिक शोषण करून या नराधमाचे मन भरले नाही, तर त्याने त्या अबलांचे अश्लील व्हिडिओ चित्रित केले. हे व्हिडिओ म्हणजे त्याच्यासाठी केवळ ‘फोटोज’ नव्हते, तर त्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे शस्त्र होते. “मी तुझे व्हिडिओ व्हायरल करेन,” ही एका वाक्याची धमकी देऊन त्याने कितीतरी मुलींचे बालपण आणि त्यांचे भविष्य काळवंडून टाकले.

१०० व्हिडिओ…१०० उद्ध्वस्त झालेली स्वप्नं!

जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू झाला, तेव्हा पोलिसांच्या हाती जे लागलं ते पाहून अनुभवी अधिकारीही हादरले. आरोपीच्या मोबाईलमध्ये आणि सोशल मीडिया खात्यांवर तब्बल १०० हून अधिक अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. विचार करा, त्या शंभर मुलींच्या घरात जेव्हा ही बातमी समजली असेल, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली असेल. ज्या मुलींना आपण शाळेत-कॉलेजला मोठ्या आशेने पाठवतो, त्याच मुली या ‘डिजिटल सैतानाच्या’ सावज ठरल्या होत्या. हा अयान अहमद एकटा होता की त्याच्या मागे मोठी टोळी आहे? हे शंभर व्हिडिओ त्याने कोणाकोणाला पाठवले? हे व्हिडिओ डार्क वेबवर विकले गेले का? हे प्रश्न आता केवळ अमरावती पोलिसांनाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला सतावत आहेत.

पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’ आणि बुलडोजरचा न्याय

या प्रकरणाचे पडसाद उमटताच अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी कोणतीही हयगय न करता तातडीने SIT (विशेष तपास पथक) स्थापन केले. डॉ. शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथक आता या प्रकरणाच्या मुळाशी जात आहे. आरोपीला अटक झाली असली, तरी समाजात असलेला रोष शांत करण्यासाठी प्रशासनाने त्याच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोजर फिरवला. हो, ही ‘बुलडोजर कारवाई’ गरजेची होती. कारण जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेला कोणी आव्हान देतं, तेव्हा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणं आवश्यक असतं. पण प्रश्न हा उरतो की, घर पाडल्याने त्या मुलींच्या मनावर झालेले जखम भरून निघणार का? त्या शंभर पीडितांचे काय, ज्यांच्या सन्मानाची होळी या विकृताने केली?

“हे तुमच्याही जिल्ह्यात घडू शकतं…”

ही घटना वाचताना तुम्हाला वाटत असेल की हे अमरावतीत झालंय, आपल्याकडे नाही. पण थांबा! हाच तो गाफीलपणा आहे ज्याचा फायदा अयान अहमदसारखे गुन्हेगार घेतात. सोशल मीडियाच्या युगात एखादा ‘अनोळखी’ मित्र कधी तुमच्या मुलीच्या मोबाईलमध्ये शिरतो आणि कधी तिचे आयुष्य उद्ध्वस्त करतो, हे समजायला वेळ लागत नाही. तुमची मुलगी तासनतास मोबाईलवर काय करते?, तिचे ‘फ्रेंड्स’ कोण आहेत?, ती अचानक शांत किंवा चिडचिडी झाली आहे का?, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वेळ आता आली आहे. अमरावतीची घटना ही एक धोक्याची घंटा आहे. हे केवळ एका जिल्ह्याचे दुखणे नाही, तर हे प्रत्येक घरासाठी दिलेले सावधानतेचे संकेत आहेत.

कायद्याचा फास की केवळ कागदी घोडे?

आरोपीवर पोक्सो आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण जनतेची मागणी एकच आहे—खटला जलदगती न्यायालयात चालवून अशा नराधमांना अशी शिक्षा द्या की, पुन्हा कोणत्याही ‘अयान’ची अशा प्रकारे वागण्याची हिंमत होणार नाही. केवळ अटक आणि कोठडी पुरेशी नाही, तर समाजात वावरणाऱ्या अशा लांडग्यांचा कायमचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे.

सावध व्हा:आता गप्प बसू नका!

अमरावती पोलिसांनी आवाहन केले आहे की, ज्या मुली या जाळ्यात अडकल्या आहेत त्यांनी घाबरू नये. तुमची ओळख गुप्त राहील, पण तुमचा एक जबाब या सैतानाला फासापर्यंत नेण्यास मदत करेल. पालकांनो, आपल्या पाल्यांशी संवाद साधा. त्यांना विश्वासात घ्या. अमरावतीने जे सोसलंय, ते इतर कोणत्याही जिल्ह्याला सोसावे लागू नये, हीच अपेक्षा. पण त्यासाठी समाजाने, पालकांनी आणि प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कारण हा ‘अयान’ फक्त एक व्यक्ती नाही, तर ती एक विचारसरणी आहे, जी नष्ट करणे ही काळाची गरज आहे. लक्षात ठेवा, आज अमरावती पेटलंय… उद्या तुमचं शहर सुरक्षित ठेवायचं असेल, तर आजच सावध व्हा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!