बुलढाणा जिल्ह्यात खळबळ: दोन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणांहून ६ जण बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण ६ जण बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये दोन तरुणी, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या असून पोलीस प्रशासनाकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

खामगाव: शहर पोलीस स्टेशन हद्दीतून २७ मे रोजी एक २६ वर्षीय महिला, ७ वर्षांचा मुलगा आणि ३ वर्षांची मुलगी राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु अद्याप त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

रायपूर: पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सैलानी दर्गा परिसरात २८ मे रोजी एक २० वर्षीय तरुणी आपल्या वडिलांसोबत सैलानी येथे दर्शनासाठी आली होती. दर्गा परिसरातून ती अचानक बेपत्ता झाली. आजूबाजूच्या दुकानांवर आणि परिसरात शोध घेऊनही ती मिळून आली नाही. याप्रकरणी रायपूर पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास रायपूर पोलीस करीत आहेत.

बिबी: पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातील २१ वर्षीय तरुणी २८ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास सुलतानपूर येथे कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडली होती, मात्र ती वेळेत घरी परतली नाही. नातेवाइकांनी सर्वत्र चौकशी केली असता, ती मिळून आली नाही. याप्रकरणी बिबी पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हिवरखेड: पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातून एक १८ वर्षीय तरुणी २८ मे रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता निघून गेली आहे. गावकऱ्यांनी आणि नातेवाइकांनी शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याप्रकरणी मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास हिवरखेड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!