बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):धाड पोलीस स्टेशन हद्दीतील देवपूर शिवारात बेकायदेशीरपणे ताशपत्त्यांवर पैशांची हार-जीत लावून एक्का बादशहा जुगार खेळणाऱ्या ७ जणांवर धाड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह, एकूण ६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवपूर शिवारात पैशाच्या हारजितवर एकाबादशहा नावाचा जुगार खेळल्या जात असल्याची गुप्त माहिती धाड पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उपरोक्त ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी आरोपी राजू सखाराम नरोटे (वय ५५ वर्षे), अमोल लक्ष्मण नरोटे (वय २७ वर्षे), विशाल शेनफड वारे (वय ४० वर्षे), रघुनाथ समाधान नरोटे (वय ४५ वर्षे), शिवाजी पांडुरंग जाधव (वय ४१ वर्षे), अमोल भगवान खिरडकर (वय २५ वर्षे), रघुनाथ सदाशिव कुन्नर (वय ३८ वर्षे) सर्व रा. देवपूर हे सार्वजनिक ठिकाणी पैशाच्या हारजीतवर एक्का बादशहा नावाचा जुगार खेळतांना रंगेहात मिळून आले. यावेळी आरोपींच्या ताब्यातून ६ हजार १०० रूपांची रोकड, ५२ पत्त्यांचा एक कॅट (किंमत ५० रुपये), असा एकूण ६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपरोक्त आरोपींविरुद्ध धाड पोलिसांत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनात धाड पोलीस करीत आहेत.
