मलकापूर ‘व्हायरल व्हिडिओ’ प्रकरण: गुपचूप रेकॉर्डिंग करून बदनामी करणाऱ्या ‘त्या’ विकृतावर गुन्हा दाखल!

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): मलकापूर शहरात गेल्या काही तासांपासून ज्या आक्षेपार्ह व्हिडिओने सोशल मीडियावर वादळ निर्माण केले होते, त्या प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे. पीडित २५ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अविनाश रोहिदास धामोणे (वय २६ वर्षे) रा. रोहिदास नगर, मलकापूर याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी आणि आरोपी अविनाश हे एकमेकांच्या ओळखीचे होते. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर, संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. मात्र, या दरम्यान आरोपी अविनाशने पीडितेच्या संमतीशिवाय त्यांच्या खाजगी क्षणांचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर हे अश्लील रेकॉर्डिंग आरोपीने व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडियावर प्रसारित करून तरुणीचा विनयभंग केला आणि तिची समाजात मोठी बदनामी केली. हा व्हिडिओ एकाच्या मोबाईलवरून दुसऱ्याच्या मोबाईलवर वेगाने फॉरवर्ड झाला.

याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अविनाश रोहिदास धामोणे (वय २६ वर्षे) रा. रोहिदास नगर, मलकापूर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ७७ आणि ३५६ (४) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश बेले करीत आहेत. या कारवाईमुळे मलकापुरातील डिजिटल गुंडांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांचा कडक इशारा

उपरोक्त व्हिडिओ पुढे पाठवणे किंवा शेअर करणे हा देखील कायदेशीर गुन्हा आहे. सायबर पोलिसांची टीम यावर बारीक लक्ष ठेवून असून, व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्यांवरही कडक कारवाईची करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!