स्वंयभू मारोती संस्थानात हनुमान जन्मोउत्सवाची महाप्रसादाने सांगता

बुलढाणा,(प्रतिनिधी): येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सावाची आज २ एप्रिल रोजी महाप्रसादाने सांगता करण्यात आली.

शहरातील प्रञकार भवन परिसरातील स्वंयभू मारोती संस्थानात ४१ वर्षा पासून हा उत्सव साजरा करण्यात येतो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हनुमान जयंती नमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्त १ एप्रिल रोजी सुनिल जोशी यांचे शारदा भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तर आज २ एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी ६ वाजता हनुमंतरायाचा जन्मोतउत्सव पार पडला. सकाळी १० ते १२ लोकजागरण मंचचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर दुपारी १२ ते ४ वरण, भात, पोळी, वांग्याची भाजी, बुंदी असा महाप्रसादाचे वाटप करण्यात येवून जन्मोउत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी स्वंयभू मारोती संस्थान मिञमंडळ, बुलढाणा यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!