क्राईम जगत

छत्रपती संभाजीनगरमधून १७ वर्षीय मुलाचे अपहरण

सात जणांनी फरफटत गाडीत कोंबले

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी चांगलीच फोफावत असून नागरिकांची सुरक्षा धोक्यात सापडली आहे. बोदवडच्या व्यापाऱ्याचे अपहरण करून खून केल्याची घटना ताजी असतानाच सिडकोच्या बजरंग चौकातून एका १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाले. कारमधून आलेल्या ७ अपहरकर्त्यांनी या गुन्ह्याला अंजाम दिल्याची धक्कादायक घटना आज ३ जानेवारीच्या पहाटे घडली.
आपल्या पतीपासून विभक्त झालेली एक ३८ वर्षीय महिला तिच्या दोन मुलांसमवेत छत्रपती संभाजीनगर येथील सिडको एन ७ मध्ये वास्तव्यास आहे. या महिलेला दोन मुले असून मोठा मूलगा १७ वर्षाचा असून तो इयत्ता १२ मध्ये शिक्षण घेत आहे. तर लहान मूलगा १२ वर्षाचा असून तो इयत्ता सातवीत शिकत आहे. २ जानेवारीच्या रात्री साडेदहा वाजता दरम्यान सदर महिला आणि त्यांची मूले घरात होते. यावेळी त्यांच्या मोठ्या मुलाचा मित्र घरासमोर आला आणि मुलाला आवाज दिला. मी मित्रासोबत बाहेर जाऊन येतो, असे सांगत मोठा मुलगा घराबाहेर पडला.
मध्यरात्रीनंतर सव्वाबारा वाजता दरम्यान महिला मोठा मुलगा आणि त्याचा मित्र हे स्कुटीवर बसून मेडीकव्हर हॉस्पिटल (एन ६) कडून बजरंग चौकाकडे गेले. चौकातील वळणावरून वळण घेत असताना, मागून आलेल्या दोन अपहरणकर्त्यांनी या मुलाला ओढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलाच्या मित्राने स्कुटी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपहरणकर्त्यांच्या ओढतडीत ते स्कुटीवरून खाली पडले. त्याचवेळी तिसरा अपहरणकर्ता धावत आला आणि तिघांनी मिळून मुलाला फरफटत न्यायला सुरुवात केली. त्यावेळी एका मोटारसायकलवर आलेल्या अपहरणकर्त्यांच्या साथीदारांनी मुलाला बळजबरी ओढत नेत एमएच-२०एच-४६६८ क्रमांकाच्या कारमध्ये कोंबले. आणि पाच जण कारमध्ये जाऊन बसले. त्याच क्षणी कारमध्ये आधीच उपस्थित असलेल्या चालकाने कार दामटत निघून गेले. तर उर्वरित दोन अपहरकर्त्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली.
मुलाच्या मित्रांचे सदर महिलेला ही बाब सांगितल्यानंतर महिलेने आपल्या भावासह सिडको पोलीस स्टेशन गाठले असून याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नानेकर हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!