क्राईम जगत

किडनॅपर पकडले! “त्या” १७ वर्षीय मुलाची सुटका

गाडीच्या पैशासाठी केले होते अपहरण; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : सिडकोच्या बजरंग चौकातून सात आरोपींनी एका १७ वर्षीय मुलाचे अपहरण केले होते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, घटनेच्या अवघ्या सात तासांत पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीत मुलाची सुखरूप सुटका करून अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या. नव्हेतर उपरोक गुन्हा उघडकीस आणला.
छत्रपती संभाजीनगर येथील सिडको एन ७ मध्ये आपल्या मुलांसोबत वास्तव्यास असलेल्या ३८ वर्षीय महिलेच्या १७ वर्षीय मुलाचे अपहरण ३ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर सव्वाबारा वाजता दरम्यान बजरंग चौकातील वळणावरून सात अपहरणकर्त्यांनी अपहरण केले होते. मुलाच्या मित्रांचे सदर महिलेला ही बाब सांगितल्यानंतर महिलेने आपल्या भावासह सिडको पोलीस स्टेशन गाठले असून याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलीस उरपनिरीक्षक अनिल नाणेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष शेवाळे, पोलीस अंमलदार मंगेश पवार,विशाल सोनवणे, शिवाजी भोसले, महादेव दाणे, देवा साबळे, प्रदीप फरकाडे यांनी सदर बाब गांभीर्याने घेत गुन्ह्याचा युद्धपातळीवर तपास सुरू केला. तांत्रिक माहिती काढून गुन्ह्यात वापरलेल्या कारचा शोध घेतला. सदर कार रांजणगाव शेणणपंजीच्या गणेश सोनवणे यांची असल्याचे समजताच पोलिसांनी त्यांचे घर गाठले. सदर कार आपला मुलगा विवेक घेऊन गेल्याची माहिती गणेश सोनवणे यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मोबाइल लोकेशन काढून वाळूज नजीक विवेक सोनवणे, पांडुरंग सोनवणे, रोहन डव्हळे याच्या मुसक्या आवळल्या असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
गाडीच्या पैशासाठी केले अपहरण
रोहन डव्हळे याने अपहरण झालेल्या मुलाला स्वतःची स्पोर्टस बाइक विकली होती. ५ महिने उलटूनही त्याने रोहनला पैसे दिले नाही. मध्यंतरी तो मुंबईलाही पळून गेला. दरम्यान, तो शहरात आल्याची माहिती मिळाल्याने गाडीच्या पैशासाठी रोहनने आपल्या मित्राच्या मदतीने त्याचे अपहरण केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!