जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळाव्यात सहकार विद्या मंदिरचे वर्चस्व!

मोताळा: येथील सहकार विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळाव्यात शहरी विभागात आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत घवघवीत यश संपादन केले आहे. या मेळाव्यात शाळेच्या गाईड पथकाने (मुली) शहरी विभागात प्रथम क्रमांक, तर स्काऊट पथकाने (मुले) तृतीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
राष्ट्रीय सैनिकी स्कूल, कोलवड (बुलढाणा) येथे हा जिल्हास्तरीय मेळावा ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत उत्साहात पार पडला. या मेळाव्यात जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्काऊट विभाग (मुले)(शहरी): मुलांच्या स्काऊट पथकाने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तृतीय क्रमांक संपादन केला..शिस्त, धाडस आणि विविध प्रात्यक्षिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेने प्रथम क्रमांक मिळवला.
या तीन दिवसीय मेळाव्यात विद्यार्थ्यांनी तंबू निवास, गाठी मारणे, प्रथमोपचार, साहसी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेशामजी चांडक, नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.सुकेशजी झंवर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबलच्या अध्यक्षा कोमलजी झंवर, तसेच मुख्याध्यापक अभिजित देशमुख आणि शिक्षक वृंदातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेचे स्काऊट मास्टर आणि गाईड कॅप्टन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापकांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले..



