छत्रपती संभाजीनगर
…अन् संतप्त महिलेने फोडली “सीआयडी” एसपींच्या गाडीची काच!
पोलीस अधीक्षकांच्या गाडीला ऑटो रिक्षाची धडक; आटोतून प्रवास करणारे प्रवासी किरकोळ जखमी

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी): “सीआयडी” अर्थात राज्य गुन्हे अन्वेषण विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक दीपक गिऱ्हे यांच्या शासकीय वाहनाला एका भरधाव ऑटो रिक्षाने जोरदार धडक दिली. छत्रपती संभाजी नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ही घटना घडली. या घटनेनंतर संतप झालेल्या
श एका महिलेने चक्क पोलीस अधीक्षकांच्या गाडीची काच फोडली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. नव्हे तर काही काल तणावाचे वातावरण निर्माण झाले.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक दीपक गिन्हे हे शासकीय कामानिमित्त आपल्या “टाटा हेरियर” कार क्रमांक एमएच-१५-जीव्ही-००१५ ने छत्रपती संभाजी नगर शहरात आले होते. त्यांचे वाहन चालक भरत काशिनाथ पवार हे गाडी चालवत होते. दुपारी अंदाजे साडेतीन वाजेच्या सुमारास ते बेगमपुरा भागातून छावणीकडे जाण्यास निघाले. त्यांचे वाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर येताच समोरून निष्काळजीपणे व भरधाव वेगात येणाऱ्या ऑटोरिक्षाने क्रमांक एमएच-२०-इएफ-४१५४ ने पोलीस अधीक्षकांच्या कारच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाला जोरदार धडक दिली आणि ऑटो रिक्षा रस्त्यावर तिथेच पलटी झाला. या अपघातात ऑटो रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी किरकोळ जखमी झाले. या
अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी जमा होत जखमींना तातडीने शासकीय घाटी रुग्णालयात उपचार कामी दाखल केले. मात्र, यादरम्यान जमावातील एका महिलेने रस्त्यावरील दगड उचलत परिस्थितीचा कोणताही आढावा न घेता पोलीस अधीक्षकांच्या गाडीची काच फोडून आपला संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे या कारवर “पोलीस” लिहिलेली पाटी आणि दिवा देखील होता. यामध्ये पोलीस अधीक्षकांच्या गाडीचे वीस ते पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
अपघातानंतर रिक्षाचालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली. याप्रकरणी चालक भरत पवार यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिसांत ऑटो चालकासह गाडीची काच फोडणाऱ्या महिलेवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ऑटो रिक्षा चालक व महिलेचा शोध घेत आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विद्यमान पोलीस अधीक्षक दीपक गिऱ्हे हे एकेकाळी छत्रपती संभाजीनगर पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यामुळे दीपक गिर हे नाव सर्वांनाच परिचित असल्यामुळे या अपघाताची चर्चा वाऱ्यासारखी पसरली, हे विशेष!