
खामगाव,(प्रतनिधी): सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अकोला विभागाच्या वतीने शेतकरी व कृषी उद्योजकांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी ‘नॅशनवाइड मेगा एग्रीकल्चरल क्रेडिट आऊटरीच प्रोग्राम’ या विशेष कृषी कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून संत शिरोमणी तुकाराम महाराज हॉल (खामगाव) येथे होणार असून त्यानंतर भोजनाची व्यवस्था ठेवण्यात आली आहे.या कार्यक्रमास शेतकरी, स्वयं-सहायता गट, कृषी उद्योजक, डाळ मिल व तेल गिरणी उद्योग, व्यावसायिक तसेच ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमात कृषी कर्ज, पीक कर्ज, कृषी प्रक्रिया उद्योग, एमएसएमई योजना तसेच व्याज अनुदान योजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ. रमेश्वर पुरी राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी सुनील पाटील, मुख्याधिकारी नगर परिषद डॉ. प्रशांत शेळके, तालुका कृषी अधिकारी सुनील पवार, एमआयडीसीचे मोहन आर. तीवारी, ऑइल मिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल, एमआयडीसी जे. पी. तिवारी व एमआयडीसी चिखलीचे अमित जैन उपस्थित राहणार आहेत.तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी जनरल मॅनेजर हेमंत शर्मा, प्रादेशिक व्यवस्थापक पंकज कुमार, लीड डिस्ट्रक्टि मॅनेजर के. के. सिंग व डेप्युटी रिजनल मॅनेजर अरुण प्रकाश यांची विशेष उपस्थिती राहील. या वेळी वक्ते म्हणून पंकज अग्रवाल हे कृषी व एमएसएमई अनुदान तसेच व्याज सवलत योजनांवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खामगाव शाखेच्या वतीने करण्यात आले असून परिसरातील शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



