टिप्परला दुचाकीची मागून जाऊन धडकली; अपघातात एकजण ठार

अजय टप

मोताळा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो)- वाघजाळ फाटा येथील गतिरोधकावर टिप्परला दुचाकीने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत मोताळा येथील 35 वर्षीय युवक ठार झाल्याची दुदैवी घटना आज 15 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बुलढाणा रोडवरील वाघजाळ फाटा येथे घडली. मृतकाचे नाव दर्शन जैन असे आहे.

मोताळा येथील दर्शन जैन हे आपल्या स्कुटी क्र.एम.एच.२८ ए.एक्स 4762 बुलढाणा येथून मोताळाकडे येत होते. दरम्यान बुलढाणा-मलकापूर रोडवरील वाघजाळ फाटा येथील गतिरोधावर टिप्पर क्रमांक एम.एच.28 बीबी.6799 च्या चालकाने वेग कमी केला असता सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दर्शन जैन यांची स्कुटी टिप्परच्या मागच्या साईडने जाऊन धडकली. यामध्ये दर्शन जैन गंभीर जखमी होवून खाली पडले. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने 108 ॲम्बुलन्सने बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी जैन यांना मृत घोषीत केले. दर्शन जैन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्याने जैन कुटुंबीयांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोस्टे.चे प्रभारी ठाणेदार एपीआय.बालाजी शेगेंपल्लू व त्यांचे रायटर सुनिल वाघ, तडवी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. सदर टिप्पर बोराखेडी पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!