मलकापूर शहरात पोलिसांची धडक कारवाई; जुलै महिन्यात ५४७ केसेस, सव्वादोन लाखांहून अधिक दंड वसूल

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच वाहतूक शिस्तीची प्रभावी अंमलबजावणी आणि अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी मलकापूर पोलीस स्टेशनने जुलै महिन्यात व्यापक मोहीम राबविली. पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत शहरात जुगार, दारूबंदी, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह, राँग साईड तसेच विविध मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण ५४७ केसेस नोंदविण्यात आल्या. या कारवाईत २ लाख ४४ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनात शहरात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, वाहतूक शिस्त आणि गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या नियोजनबध्द कार्यपध्दतीमुळे शहरात सातत्याने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जात आहे. जुलै महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जुगाराच्या १०, दारूबंदी कायद्यांतर्गत १०, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या ७ तर राँग साईड वाहन चालविण्याच्या ५० केसेसचा समावेश आहे. याशिवाय वाहन परवाना, हेल्मेट, कागदपत्रांची पूर्तता, वाहतूक नियमांचे उल्लंघन आदी विविध मोटार वाहन कायद्यांतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या सर्व कारवायांमधून एकूण ५४७ प्रकरणे नोंदवून २ लाख ४४ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील भागात विशेष तपासणी नाके उभारून सातत्याने मोहीम राबविली. मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍यांवर तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. अवैध जुगार व दारूविक्रीविरोधातही पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

यापुढील काळातही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये तसेच कायद्याचे उल्लंघन टाळावे, असे आवाहन मलकापूर पोलीस स्टेशनतर्पेâ करण्यात आले आहे. कायद्याचे पालन करणार्‍या नागरिकांच्या सहकार्यामुळे शहरात सुरक्षित, शिस्तबध्द आणि गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबध्द असल्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!